Saturday 13 August 2022

Jotibachya Navan Chang Bhala Lyric

चांग भलं र
देवा चांग भलं र
जोतिबाच्या नावान
चांग भलं र
हे...
नाव तुझ मोठ देवा
कीर्ती तुझी भारी...
डंका तुझा  ऐकुनी गा
आलो तुझ्या दारी.....
किरपा करी....
माझ्या वरी....
हाकेला  तू धाव  र
चांग भलं...
जोतिबाच्या नावान................
 चांग भलं र
देवा चांग भलं र
जोतिबाच्या नावान
चांग भलं र
(1)----------


हे भल्या  उंच डोंगरात देवा
तुझा वास र....
मर्जी तुझ्या भक्तावरी देवा
तुझी खास  र....
चांग भलं
चांग भलं
आर चुकलिया वाट ज्याची
त्याला तुझ दार र
ज्याला नाही जगी कोणी त्याचा
तू आधार र
चांग भलं
चांग भलं...
हे...
आलो देवा घेऊन मनी
भोळा भाव र
देवा कोड  माझी हि मानुनिया घे
नाही मोठ मागण
नाही कुडी  हाव र
बापा वाणी माया तू
लेकराला दे
डोई तुझ्या पायावर मुखी तुझ नाव र
चांग भलं ......
जोतिबाच्या नावान................
चांग भलं र
देवा चांग भलं र
जोतिबाच्या नवान
चांग भलं र .

Movie - Tujhya Maajhya Sansarala Aani Kaay Hawa