Saturday 17 May 2014

Fulpaakharu

Fulpaakharu, Fulpaakharu,
Chaan kiti disate, Fulpaakharu,

Ya velinvar, fulanbarobar,
Goad kiti hasate, fulpakharu,
Chan kiti disate, fulpaakharu.

Dole baarik, karitee luk luk, - 2
Gol mani janu te, fulapaakaru
Chan kiti disate, fulpaakharu.

Mi dharu jaata, yei na haata -2
Durrach te, udate fulpaakaru
Chan kiti disate, fulpaakharu

Singer: Swapnil Bandodkar

Aata Kashala Udyachi Baat

आता कशाला उद्याची बात ?
बघ उडुनि चालली रात

भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात

हा ज्वानीचा बहार - लुटू या
भरवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ
हासत करि घात


गीत - अनंत काणेकर
संगीत - मा. कृष्णराव
स्वर - शांता हुबळीकर
चित्रपट - माणूस

Wednesday 7 May 2014

Kadhi tu rimzim zarnari barsat lyrics

कधी तू.....रिमझिम झरणारी बरसात
कधी तू ...चमचम करणारी चांदरात
कधी तू... कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात

कधी तू अंग-अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात ( २ )  
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात 
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम-चम करणारी चांदरात|| १ ||

जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे विरणारे मृगजळ एक क्षणात ...( २ )
कधी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमाना वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम-चम करणारी चांद रात

चित्रपट- मुंबई पुणे मुंबई
गीतकार- सतीश राजवाडे,श्रीरंग गोडबोले
संगीत- अविनाश-विश्वजीत
गायक- हृषीकेश रानडे

Tuesday 6 May 2014

Damlelya babachi kahani Marathi Lyrics

कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी
खऱ्याखुऱ्या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत, खिदळत, बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा
क्षणा क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ मऊ दूध-भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला
आई परी वेणीफणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा
तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
बालपण गेले तुझे गुज निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळी मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?

गीतकार : संदीप खरे, गायक : संदीप खरे - सलील कुळकर्णी, संगीतकार : सलील कुळकर्णी,
Lyricist : Sandeep Khare, Singer : Sandeep Khare - Salil Kulkarni , Music Director : Salil Kulkarni

Julun Yeti Reshimgathi Title Song Lyrics

Mukyane bolale geet te jahale
Swapna sakarle pahate pahile
Naav natyala kay nave
Vegale mandale sohale tujsathi

Milave tujhe tula aas hi othi
Koni kuthe bandhalya reshimgathi

Julun yeti reshimgathi
Aapulya reshimgathi
(Repeat)

Mukyane bolale geet te jahale
Swapna sakarle pahate pahile

Unhache chandane umbaryat sandale
Daav soneri sukhache kuni mandale
(Repeat)

Khel ha kaalcha aaj kon jinkale
Haravale kavadase mulun te shodhale
Ekmekanna kay have
Je have sagalech aanale tujsathi

Kalave tuze tula mi tuzyasathi
Koni kuthe bandhalya reshimgathi

Julun yeti reshimgathi
Aapulya reshimgathi
Julun yeti reshimgathi
Reshimgathi

मुक्याने बोलले,गीत ते जाहले
स्वप्न साकारले पहाटे पाहीले
नाव नात्याल काय नवे?
वेगळे मांडले सोहळे तुज साठी...

मिळावे तुझे तुल आस हि ओठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी...

जुळून येती रेशीमगाठी...
आपुल्या रेशीमगाठी...
जुळून येती रेशीमगाठी...
आपुल्या रेशीमगाठी...

ओहो... मुक्याने बोलले,गीत ते जाहले
स्वप्न साकारले पहटे पाहिले,

उन्हाचे चांदणे उंबर्यात सांडले
डाव सोनेरी सुखाचे कोणी मांडले...

ओहो...उन्हाचे चांदणे उंबर्यात सांडले
ओहो... डाव सोनेरी सुखाचे कोणी मांडले...

ओ... खेळ हा कालचा आज कोण जिंकले
हरवले कवडसे मिळून ते शोधले
एकमेकांना काय हवे?
जे हवे सगळेच आणले तुज साठी...

ओहो... कळावे तुझे तुला मि तुझ्यासाठी...
आ.... कोणि कुठे बांधल्या रेशीमगाठी...

जुळून येती रेशीमगाठी...
आपुल्या रेशीमगाठी...
जुळून येती रेशीमगाठी...
रेशीमगाठी