सोबतीस हलके,सावलीस ऊन,भोवती तशी ही,मोरपीस खूण…दोन काठ अपुले,ऐल आणि पैल,ऐन सांजवेळी ,बंध होई सैल…बंधनाविना रे ही,गुंतणारी वीण,हा प्रवास आता,तुझ्यावीण कठीण…वादळात कोणत्याही,हाक दे कधीही,हात देत हाती,मी तिथे असेन…